टिपेश्वर अभयारण्यात 'स्टार' या वाघाचे दर्शन


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / यवतमाळ :
जिल्हा वनसंपदेने नटला आहे. याच साखळीत टिपेश्वर अभयारण्य देखील येते. पर्यटकांना व्याघ्र दर्शन होत असल्याने टिपेश्वर गर्दीने फुलून गेले आहे. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे. अशातच या 
अभयारण्यात स्टार या नर वाघाचे वाघ्र प्रेमींना दर्शन झाले. हा नर वाघ अतिशय ताकदवर समजला जातो. या भागात जे कोणते बछडे आहेत तेयाच नरवाघाचे बछडे असल्याचे मानले जाते. याचे दर्शन होणे हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. या नर वाघाच्या दर्शनाने व्याघ्र प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-02-25


Related Photos