महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनो स्वतःला कमी लेखू नका : डॉ. नरेंद्र आरेकर


- मान्यवरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावले
- सांस्कृतिक कार्यक्रम तथा विविधरंगी स्पर्धाची रेलचेल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज  : आता कृष्णा आणि सुदामांच्या शाळा वेगळ्या आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात यशोशिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाह्य सुंदरते पेक्षा कला, गुण संपन्नतेच्या जोरावर बौद्धिक सुंदरता प्राप्त करावी. कला, गुण संपन्नतेच्या जोरावर बौद्धिक सुंदरता प्राप्त करावी. कारण बौद्धिक सुंदरताच कृष्णा आणि सुदामांमध्ये समानता आणेल. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतांना ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपल्याला कमी लेखू नका असा जीवनोपयोगी मंत्र गोविंदराव मुनघाटे कला, विज्ञान महाविद्यालय कुरखेडा येथील सहाय्यक प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. विसोराच्या विनायक शिक्षण संस्था द्वारा संचालीत विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेह संमेलनाच्या उदघाटनीय सोहळ्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावरून बोलत होते. मनीष शेट्ये या कार्यक्रमाचे उदघाटक, अध्यक्ष म्हणून भय्याजी नाकाडे तर प्रा. किरण कापगते, प्रा. ओमप्रकाश संग्रामे प्रमुख मार्गदर्शक होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष नाना नाकाडे, विसोराचे सरपंच रमेश कुथे, उपसरपंच संजय करांकर, श्रीपाद वट्टे, मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे, वनिता नाकाडे, वाय. एन. पोवळे, व्यंकट पेंदाम, नामदेव सहारे, शंकर नाकाडे, आर. एन. नाकाडे, प्राचार्य बी. ए. ठाकरे, शोएब शेख, सोनाली वघारे, प्राची दुफारे, मनीष बुद्धे प्रमुख अतिथी होते. तब्बल ५२ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विसोराच्या विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालायचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचा शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्याने स्वागत केले. त्यांनतर भारत सरकारच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत शाळेला प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचे मुख्याध्यापक संघ गडचिरोलीचे अध्यक्ष मनीष शेट्ये यांच्या हस्ते उदघाटन झाले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, नावीन्यता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. बाल संशोधक तयार व्हावेत म्हणून अटल टिंकरिंग लॅब भारतातल्या निवडक शाळांना केंद्र सरकार देते. विसोरा शाळेतील अटल टिंकरिंग लॅब ही देसाईगंज तालुक्यातील पहिली लॅब आहे. लॅबच्या उदघाटन समयी डिजिटल समईचा वापर केला गेला. पूनम राऊत या विद्यार्थिनीने डिजिटल समई आणि प्राची दुफारेने थ्री डी प्रिंटर या मॉडेलचे मान्यवरांसमोर उत्तम सादरीकरण केले. संस्थेचे अध्यक्ष नाना नाकाडे यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून स्नेह संमेलन उदघाटन सोहळा पार पडला. शालेय मुलींनी स्वागत गीत सादर केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोलीचे उपमुख्याध्यापक प्रा. ओमप्रकाश संग्रामे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनातून जीवनावश्यक कौशल्य अंगी घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून राष्ट्रभक्ती जपल्यास देश घडण्यास मदत होईल आशावाद प्रमुख मार्गदर्शक प्रा. किरण कापगतेंनी व्यक्त केला. उदघाटन कार्यक्रमावेळी शाळेच्या मुलींनी मनमोहक आणि स्फूर्तीदायक गोंडी समूहनृत्य सादर करून मान्यवरांची वाहवा मिळविली. प्रास्ताविक प्राचार्य भोजराम ठाकरे, पाहुण्यांचा परिचय स्नेह संमेलन प्रमुख रमेश हरणे, अहवाल वाचन देवेंद्र नाकाडे आणि संचालन अतुल बुराडे तर आभार माधव आकरे यांनी मानले. वंदे मातरम गीताने उदघाटनीय कार्यक्रमाची सांगता झाली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos