महत्वाच्या बातम्या

 माजी गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : शिक्षण विभाग पंचायत समिती सिंदेवाही येथे माजी गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांचा सत्कार समारंभ मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती संजय पालवे विस्तार अधिकारी (शिक्षण) पंचायत समिती नागभीड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून छोटु आवळे विस्तार अधिकारी (शिक्षण) पंचायत समिती सिंदेवाही हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सज्जन तेलकापल्लीवार यांनी केले. सत्कारमूर्ती यांच्या बद्दल विचार व्यक्त नरेंद्र डेंगे केंद्र प्रमूख. साधन व्यक्ती राजकुमार अलोने, रेवन मोहूर्ले, आय इ डी लक्ष्मीचंद गहाणे, विस्तार अधिकारी छोटू आवळे, संतोष कुंटावार केंद्रप्रमुख, सागर शंभरकर केंद्रप्रमुख ,दिपक परचाके केन्द्र प्रमुख, प्रशांत बोरकर , इत्यादी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्याच बरोबर सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषयतज्ञ, समावेशीत शिक्षण तज्ज्ञ, सर्व विशेष शिक्षक यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सत्कारमूर्ती पालवे यांना शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यमान गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांच्या सुद्धा आगमना प्रित्यर्थ सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वैद्य समावेशीत शिक्षण तज्ज्ञ तर आभार विलास सावसाकडे केंद्रप्रमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे सांगता स्नेह भोजनाने झाली.





  Print






News - Chandrapur




Related Photos