'पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही' नियम पाळा : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पत्रातून जनतेला विनंती


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / हरदोई :
राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य काही मंत्र्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे यांनी 'पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही नियम पाळा', अशी कळकळीची विनंती हॉस्पिटलच्या बेडवरून पत्र लिहून राज्यातील जनतेला केली आहे.
गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्कच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे, असं टोपे यांनी म्हटलं आहे.
मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोनो हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु, कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण अखेर त्यांने गाठलेच. राज्यातील जनतेच्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरकून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.
समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा सामना अत्यंत संयमाने केल्याचं आपण पाहिले.
स्वत:ची काळजी म्हणजे कुटुंबातील प्रिय व्यक्तींची आणि समाजाची काळजी आहे. एकजुटीनं, एकमतानं, एकनिर्धारानं कोरोनाला हरवूया, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.
आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.
एकदा लॉकडाऊन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जातेय, हे आपण पाहिलं आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एकढी बिकट अवस्था होतेय की कसं जगायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. लोकांचं कोरोनाबद्दलचं गांभीर्य निघून गेलंय. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढतेय. सावध राहायला हवं. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं ते म्हणाले.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून काढणारी रुग्णसंख्या ही लोकल सुरू झाल्यामुळे नाही तर सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभात खबरदारी न घेतल्याने झाली असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज स्पष्ट केले. सद्यस्थितीत चाळी-झोपडपट्टीपेक्षा उच्चभ्रू कस्ती आणि इमारतींमध्येच 90 टक्के रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सध्यातरी संचारबंदी लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचेही काकाणी यांनी सांगितले.
  Print


News - Rajy | Posted : 2021-02-23


Related Photos