महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१० जानेवारी )

१० जानेवारी १६६ : सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.

१० जानेवारी १७३० : पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

१० जानेवारी १८०६ : केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

१० जानेवारी १८१० : नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.

१० जानेवारी १८५३ : चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

१० जानेवारी १८७० : मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.

१० जानेवारी १८७० : जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली

१० जानेवारी १९२० : पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

१० जानेवारी १९२६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

१० जानेवारी १९२९ : जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.

१० जानेवारी १९६६ : भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

१० जानेवारी १९७२ : पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.

जन्म (१० जानेवारी )

१० जानेवारी १७७५ : बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)

१० जानेवारी १८९६ : वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)

१० जानेवारी १९०० : महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

१० जानेवारी १९०१ : इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.

१० जानेवारी १९१९ : संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.

१० जानेवारी १९२७ : तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.

१० जानेवारी १९४० : पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.

१० जानेवारी १९५० : आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.

१० जानेवारी १९७४ : हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.

मृत्यू (१० जानेवारी )

१० जानेवारी १७६० : पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.

१० जानेवारी १७७८ : स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन. (जन्म: २३ मे १७०७)

१० जानेवारी १९९९ : स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.

१० जानेवारी २००२ : ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos