३० वर्षीय युवकाने केला चिमुकलीवर बलात्कार : लाहेरी उप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी
/ भामरागड : आईने आपल्या मुलीला आरोपी जवळ ठेऊन सरपण गोळा करायला जंगलात गेली असता याचाच फायदा घेऊन आरोपीने ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे घडली . याबाबत २० ऑक्टोबर रोजी पिढीतेंच्या आईने लाहेरी उप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . रामजी राजू पुंगाटी (३०) रा. लाहेरी असे आरोपीचे  नाव आहे. 
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आपल्या ५ वर्षीय मुलीला आरोपी रामजी याच्याजवड सोडून जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली असता आरोपीने याचा फायदा घेऊन चिमुकलीवर जबरी संभोग केला. अशी तक्रार दिल्याने उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे कलम ३७६ भादंवि सहकलम ४,६, ८,१० पॉस्को अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक करुणा चौगुले करीत आहेत .    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-21


Related Photos