वर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
एका अनोळखी युवतीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना काल २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.  
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सावंगी ते पालोती रस्त्यावर खदान लगतच्या निर्जनस्थळी युवतीचा  मृतदेह आढळला.  शवविच्छेदनानंतर  अन्य बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.  युवतीच्या  अंगावर निळ्या आणि गुलाबी रंगाचा स्कर्ट, तर कमरेखालील वस्त्रे मृतदेहाच्या बाजूला आढळली. मृतक युवतीचे वय २०  ते २२  वर्षाच्या जवळपास आहे.  मृतदेहाची ओळख पटवण्याचे सावंगी पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.   Print


News - Wardha | Posted : 2018-10-21


Related Photos