२२ फेब्रुवारीच्या ओबीसी महामोर्चाला आ. डॉ. होळी यांचा जाहीर पाठिंबा


- ओबिसी बांधवांनी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आमदार डॉ. होळी यांचे आवाहन
-ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न
- संबंधित मंत्री, मा.मुख्यमंत्री महामहीम राज्यपाल  यांचेशी नियमित चर्चा तसेच  विधिमंडळाच्या माध्यमातुन सातत्याने आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन

विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक २२ फेब्रुवारी २०२१  रोजी रोजी होणाऱ्या ओबीसी महामोर्चाला आपला पूर्ण जाहीर पाठिंबा असून या महामोर्चाला ओबिसी बांधवांनी, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चाला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी  केले आहे. 
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांवर सातत्याने अन्याय झालेला असून जिल्ह्यात असणारे ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी आपण मागील ६  वर्षांपासून संबंधित मंत्र्यांशी मा. मुख्यमंत्र्यांशी, महामहीम राज्यपाल यांचेशी ओबीसी बांधवांच्या प्रश्नावर चर्चा केली तसेच विधानसभेत ओबीसी बांधवांच्या विविध प्रश्नांवर तारांकित, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, औचित्याचा मुद्दा या माध्यमातूनही लक्ष वेधून घेतले परंतु अजूनपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळालेला नाही. जोपर्यंत ओबीसी बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपले हे प्रयत्न चालूच राहणार असून दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या या महामोर्चाला आपला पूर्ण  पाठिंबा आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी व ओबीसी समाज बांधवांनी या महामोर्चाला मोठ्या संख्येने यावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-02-20


Related Photos