ओबिसी मोर्चाला आ. कृष्णा गजबे यांचा जाहिर पाठिंबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
ओबीसी समाजाच्या वतीने आपल्या रास्त न्याय मागण्यांसाठी  २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथे ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसींचा आवाज बुलंद होऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या महामोर्चाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. 
आमदार गजबे यांनी राज्यात भाजपाची सत्ता असताना गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींना देखील १९ टक्के आरक्षण देण्यात यावा, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच मागील सञात बिंदुनामावली तयार करून ओबीसींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करुन  शासनाला तसा परिपत्रक काढण्यास भाग पाडले आहे.
गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असल्याने या जिल्ह्यात रोजगाराच्या पाहिजे त्या प्रमाणात संध्या उपलब्ध होत नाहीत. बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाला जिल्ह्यात १९ टक्के आरक्षण देणे गरजेचे असताना त्यातही कपात करुन ६ टक्केच आरक्षण देण्यात येत असल्याने येथील ओबीसींवर अन्याय होत आहे. जातनिहाय जनगणना करण्यात आली नसल्याने घटनादत्त आरक्षण असुनही आवश्यक त्या प्रमाणात ओबीसींना फायदा मिळाला नसल्याने स्वातंत्र्याचा ७३ वर्षानंतरही हा समाज उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या महामोर्चाला त्यांच्या रास्त न्याय मागण्या मार्गी लागण्यासाठी व ओबीसींचा आवाज शासन दरबारी बुलंद करण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी काढण्यात येत असलेल्या महामोर्चाला जाहिर पाठिंबा दिला आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-02-19


Related Photos