महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन आविष्कार स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे : प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : प्रत्येक स्पर्धेत यश अपयश ठरलेलं असतं. परीक्षकांना नंबर द्यायचे असतात. ज्यांना अपयश आलं त्यांनी पुन्हा नव्या जोमाने पुढच्या स्पर्धेसाठी सज्ज व्हायचे आहे. १२ ते १५ जानेवारी दरम्यान पुणे येथे होणाऱ्या अविष्कार स्पर्धेसाठी विजेते स्पर्धेक जातील. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ सर्वतोपरी मदत करेल. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी हताश व्हायचे नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी आविष्कार स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन संशोधक स्पर्धा आविष्कारचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून ,संचालक विद्यार्थी विकास डॉ. शैलैंद्र देव, संचालक नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य डॉ. मनिष उत्तरवार, आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य मृणाल काळे, चिंतामणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगींनवार , प्रा. डॉ. योगेश्वर दुधपचारे प्रा .रूपेंद्रकुमार गौर आदी उपस्थित होते. मनोगत व्यक्त करतांना, नव संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार म्हणाले, आपलं जीवन हे एक प्रयोगशाळा आहे. जुन्या पेक्षा सुधारित चांगलं काय आपण देऊ शकतो. याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवाय. अविष्कार स्पर्धेतून जे विद्यार्थी पुढे येतील त्यांना विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्रामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आविष्कार स्पर्धेत ६ प्रवर्गातून ४५ प्रकल्प होते .त्यातून २९ प्रकल्पांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण डॉ. मनिष उत्तरवार, प्राचार्य मृणाल काळे, प्राचार्य राजीव वेगिंनवार , प्रा. अनिरुद्ध गचके, प्रा. धनराज पाटील, प्रा. योगेश्वर दुधपचारे यांनी केले. यातून विजेते झालेले विद्यार्थी १२ ते१५ जानेवारी दरम्यान पूणे येथे होणाऱ्या राज्य स्तरीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होतील. प्रास्ताविक संचालक विद्यार्थी विकास डॉ. शैलैंद्र देव यांनी ,संचालन प्रा. पल्लवी सातकर तर आभार प्रा. नंदा यादव यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक तसेच विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अविष्कार स्पर्धेत शेती साहित्या पासून तर कॉम्प्रेसर जेट इंजिन, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, शेतात टाकण्यासाठी कंपोस्ट खत, सॉईल मॉइश्चराझर सेन्सर, सोलर ऑपरेटर मल्टीफंक्शनल पावर टिलर, रेनवॉटर अलार्म सिस्टिम, अल्कोहोल रहित नैसर्गिक सॅनिटायझर, ट्रॅफिक अलार्म मॉडेल , अन्नधान्यातील भेसळ घरगुती सामग्रीचा वापर करून शोधणे यासारखे नानाविध प्रकारचे नवसंशोधने विद्यार्थ्यांनी सादर केली होती.

विजेते स्पर्धक : मानव विज्ञान प्रवर्गातून प्रथम पायल किशोर कांबडी, श्री यादवराव पोशट्टिवार कला महाविद्यालय तळोधी, श्वेता सुनील बोबडे डॉ. आंबेडकर कॉलेज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, सिमरन कापोरसे, द्वितीय श्रीकांत साव, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी प्रवर्गातून प्रथम फलक चुघे, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, साक्षी गोनाडे, वेदांत अलमस्त, द्वितीय हिना राऊत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, पल्लवी यादव , ऐश्वर्या आक्केवार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, विज्ञान प्रवर्गातून प्रथम पायल प्रकाश बनकर, सरदार पटेल महाविद्यालय, मोहनीश ठाकरे खत्री महाविद्यालय तुकुम, प्रिया बागडे , श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, द्वितीय दिप्ती फाले सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर , मेगा खैरे आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर, पूजा मत्ते सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, कृषी आणि पशुवैद्यकीय प्रवर्गातून प्रथम सायली किशोर कावळे, चिंतामणी कला आणि सायन्स महाविद्यालय, निलेश गेडाम खत्री महाविद्यालय तुकुम, चंद्रपूर, अरीगराज पार्वते श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव द्वितीय क्रमांक जतिन गिरडकर ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, अक्षय पाल, खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रवर्गातून प्रथम राजविका प्रमोद वेगिनवार, भोजराज लांजेवार, संतोष शिंदे सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, द्वितीय रोहित गुटनवार, चिंतामणी विज्ञान महाविद्यालय, तृप्ती दिलीपराव गौरकार , नेहा गिरडकर सरदार पटेल महाविद्यालय वैद्यकीय आणि औषधी प्रवर्गातून प्रथम धनश्री सोनकर, ग्रामगीता महाविद्यालय चिमुर, वाई देवगडे डॉ. खत्री महाविद्यालय तुकुम, द्वितीय खेमदेव नंदकिशोर बुरले , आंबेडकर कॉलेज कला आणि विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर.





  Print






News - Gadchiroli




Related Photos