महत्वाच्या बातम्या

 जी. डी. सी. अँण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. अँण्ड ए. बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकिय सहकार व लेखा पदविका (जी. डी. सी. अँण्ड ए.) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परीक्षा २६, २७, व २८ मे, २०२३ रोजी घेण्यात येणार असुन अर्ज भरण्याची मुदत ५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. चलनद्वारे बँकेमध्ये शुल्क भरावयाची मुदत ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. सदर परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन अर्जाव्यतीरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड तयार करुन करता येईल. परीक्षेकरीता लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे अर्जासाठी तपशील, परीक्षा शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुट, अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसुचना https:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर महत्वाचे दुवे मधील जी. डी. सी. अँन्ड ए. मंडळ येथे उपलब्ध आहे. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos