महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन रस्साखेच स्पर्धेचे पारीतोषीक वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आतंर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धे अंतर्गत रस्साखेच स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी  क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांच्या मुला - मुलांची संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.
मुलांच्या संघात : प्रथम - सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, द्वितीय - राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर, तृतीय - आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा
मुलींमध्ये : प्रथम - सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही, द्वितीय -  सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, तृतीय - आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यातून निवडलेला विद्यापीठाचा संघ १४ ते १७ जानेवारी दरम्यान राजस्थानात होणाऱ्या जगन्नाथ युनिव्हर्सिटी येथे जाणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos