बार चालकाकडून ५० हजारांची लाच रक्कम स्वीकारल्यावरून कोरंभीटोला येथील ग्रामसेवकावर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / गोंदिया :
देशी दारू दुकान व गाव अंतर्गत दारू दुकाने बंद करण्याबाबत कोरंभीटोला ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. सदर ग्रामसभेचा ठराव मध्ये तक्रारदाराच्या मालकीच्या सरकारमान्य विदेशी दारू दुकानाचा उल्लेख न केल्याचा मोबदला म्हणून १ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५० हजारांची लाच रक्कम स्वीकारणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथील ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम २०१८ अन्वये अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पंजाब लोभा चव्हाण असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे . 
सदर कारवाई एसिबी चे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक रमाकांत कोकोटे  , पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर , राजेश शेंद्रे , रणजित बिसेन , दिगांबर जाधव , नितीन राहंगंडाले, देवानंद मारभते आदींनी केली आहे .    Print


News - Gondia | Posted : 2018-10-20


Related Photos