महत्वाच्या बातम्या

  विभाग स्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान (उमेद), बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील प्रशिक्षित महिलांकरीता विभागस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धाचे आयोजन उद्या १० जानेवारी रोजी लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला महाबोधी विहारासमोर, शास्त्री चौक येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील आसेटीद्वारे प्रशिक्षीत प्रशिक्षणार्थ्यांची, प्रोसेस, प्रोडक्ट, अँग्रीकल्चर यावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहण्याचे आवाहन आरसेटीचे निर्देशक मिलींद इंगळे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos