मेक इन गडचिरोली वेबसाईटचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतीनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या मेक इन गडचिरोलीच्या वेब साईटचे शुभारंभ चंद्रपूर येथील एन.डी. हॉटेल येथे अभिनव नाविन्यपूर्ण सहारी सदस्यांच्या कार्यशाळेत राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले . 
यावेळी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधानपरिषद सदस्य अनिल सोले ,गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई भांडेकर, चंद्रपूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष  भोंगळे, वर्धाचे जिल्हा परिषद अध्यक्ष , सहकार क्षेत्रातील प्रतिष्टीत मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते . 
याप्रसंगी प्रामुख्याने मेक इन गडचिरोलीच्या १०० उद्योगाबाबत प्रस्तुत करण्यात आले . या वेब साईटचा यशस्वी शुभारंभ करण्यासाठी  हैद्राबादचे श्रीनिवास दोंतुंना, जणी दासरवार, राजू दासरपणार , सी. जीवन , मेक इन गडचिरोली जिल्हा संयोजक रमेश अधिकारी यांनी प्रयत्न केले .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-20


Related Photos