प्रायोगिक औषध केवळ दोन तासांत लक्षणे कमी करू शकतात : संशोधनात मोठा दावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
खेळ वृत्तसंस्था / न्यूयॉर्क :
कोरोना विषाणूनं काही महिन्यांपूर्वी जगात हाहाकार माजवला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी अद्यापही त्याचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. अशातच काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. परंतु अनेक ठिकाणी अद्यापही त्यावरील औषधांवर संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणूची गंभीर लक्षणं असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्रसार रोखणाऱ्या एका प्रायोगिक औषधाची मानवी चाचणी आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार आहे. इस्रायलच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या एलोसेटरा या औषधांवर मोठा दावा केला आहे. २१ मधील १९ रुग्णांना सहा दिवसांत चाचणी घेतल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आणि कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमधील हेल्थकेअर कंपनी फेअर हेल्थनं दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात डिस्चार्ज करण्यापूर्वी कोविडच्या रूग्णांनी ४ ते ६ दिवस रुग्णालयात घालवले होते. प्रायोगिक औषध घेणाऱ्या ४९ वर्षीय एका व्यक्तीनं उपचाराच्या काही तासांच आपल्याला काही वेगळेपण जाणवू लागल्याचा दावा केला. त्याला येणारा खोकलाही थांबला आणि श्वासही योग्यरित्या घेता येऊ लागला असं त्यानी म्हटले. 
इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन दिवसांतच डिस्चार्ज झालेल्या तय्यब या रुग्णानं आपला यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं. ११ फेब्रुवारी रोजी या चाचणीचे निकाल उत्साहवर्धक असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितलं परंतु हे प्रमाणित संशोधन नसल्यानं औषध प्रभावी सिद्ध होऊ शकत नाही असा इशारा दिला. इस्रायलमध्ये यशस्वी झालेल्या दुसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीत सामील झालेल्या ११ रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं होती.
या व्यतिरिक्त १० रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणं होती. तर दुसरीकडे ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं गंभीर होण्याची शक्यता होती त्यांना औषधं दिल्यानंतर दोन दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर ज्यांची प्रकृती गंभीर होती त्या रुग्णांना आठ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गंभीर आणि सामान्य प्रकृतीमध्ये काय फरक होता हे अद्याप वैज्ञानिकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
या चाचणीत सहभागी झालेल्या तय्यब नावाच्या रुग्णाला औषध घेण्यापूर्वी खोकल्याचा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. "त्यांनी मला औषध दिलं. अचानक दोन तासांनी माझ्या शरीरात काही वेगळं जाणवू लागलं. माझा खोकलाही थांबला आणि श्वास घेण्यात होत असलेला त्रासही थांबला. मला एकदम उत्तम वाटू लागलं होतं. तसंच घामही येणं बंद झालं होतं. मी यावर अद्यापही विश्वास करू शकत नाहीये," असं तय्यबनं इस्रायलमधील चॅनल १३ शी बोलताना सांगितलं. दोन दिवसांपूर्वी मला माझ्या पायांवरही उभं राहता येत नव्हतं. पण आता मी घरी जातोय असं त्यानं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर म्हटल्याचंही त्यांनी सांगितले. 
  Print


News - World | Posted : 2021-02-14


Related Photos