महत्वाच्या बातम्या

 मांजा विक्री दुकानांची मनपाद्वारे तपासणी


- नायलॉन मांज्यावर नजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात. त्यामुळे अश्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाद्वारे मांजा विक्री दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. मनपा उपद्रव शोध पथकांद्वारे नियमित पतंग, मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असुन नायलॉन मांजा आढळल्यास विक्रेत्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिना भरा आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. नायलॉन धागा वापरण्यास बंदी असतांना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळुन येते. याच्या वापराने पशु - पक्षी तसेच नागरीकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये व नागरीकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos