महत्वाच्या बातम्या

 गरीबीमुळे शिक्षणापासून दूर जाऊ नका बँक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे : व्यवस्थापक सतीश कावरे


- कलार समाज बहुउद्देशीय संस्थेमार्फत आयोजित मेळाव्यात सतीश कावरे यांची ग्वाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : आर्थिक परिस्थिती दुर्बळ आहे.  म्हणून गरीब विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास सोडू नये, यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून उच्च शिक्षण घेता येतो, त्यासाठी बँक ऑफ इंडिया कडून सदैव कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहोत, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सतीश कावरे यांनी गुटेकसा येथील सर्व वर्गीय कलार समाजाच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते.

कुठे कसा आहे. ते तालुक्यातील सर्व वर्गीय कलार समाजाच्या वतीने कलार समाज बहुउद्देशीय संस्था आयोजित केलेल्या मेळाव्या प्रसंगी वधु वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह सोहळे आयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून विचार मंथन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची येथील बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापन सतीश कावरे प्रमुख अतिथी कलार समाज बहुउद्देशीय संस्थचे अध्यक्ष महादेव बनसोड, सचिव रामकुमार नाईक, कोषाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, सर्व वर्गीय कलार समाज तालुका महीला अध्यक्ष शिखा शेंडे, राहुल माडवे, प्रा. चक्रधर मांडवे, डॉक्टर नंदकिशोर शेंडे, माडवे कुरखेडा आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीराताई बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन भूमेश्वर शेंडे यांनी मानले, मेळावा यशस्वी करण्यासाठी धनंजय शेंडे, सुनिल देशमुख, राजू शेंडे, महेश बनसोड, संतोष शेंडे, विनायक शेंडे, गणेश राम शेंडे, विठ्ठल शेंडे, परसराम शेंडे, कीर्तन लाल देशमुख, भारत लाल देशमुख, शिवलाल देशमुख, प्रकाश शेंडे, देवेंद्र शिंदे, बाबूलाल शेंडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos