सीरसगाव येथे सोयाबीन काढताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट :
सोयाबीन ची काढणी करीत असताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा मृत्यू  झाल्याची घटना तालुक्यातील सीरसगाव येथे आज २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११  वाजता घडली.   
  सुनील चांदेकर  (३५)  रा . सीरसगाव असे मृतक युवकाचे नाव आहे.   सुनील चांदेकर हा   सोयाबीन काढन्यासाठी गोलू डबले यांच्या हडंबा मशीनवर  शेतात कामाला गेला होता. मशीन सुरु असताना  त्याचा  अचानक पाय मशीनमध्ये   सापडला. यामुळे त्याचा  जागीच मृत्यू  झाला .  सुनील याचा  विवाह होऊन   दोन वर्ष झाले होते व  त्याला एक मुलगी   आहे. सुनीलच्या मृत्यूमुळे  परीवारावर  दुःखा चे आभाळ कोसळले आहे.  Print


News - Wardha | Posted : 2018-10-20


Related Photos