महत्वाच्या बातम्या

 मुंबईत आढळले कोरोनाचे ४ रुग्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईत कोरोनाचे ४ रुग्ण सापडले. या चारही जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दिवसभरात २ हजार २७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना नियंत्रणात असल्यामुळे दिवसभरात केवळ ४ रुग्ण सापडले.

सक्रिय रुग्णांची संख्याही मोठय़ा प्रमाणात कमी झाली असून मुंबईत सध्या २९ सक्रिय रुग्ण आहेत तर ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यात २० रुग्ण सापडले तर ३२ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात १२५ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यू, गंभीर रुग्णांचे प्रमाण घटले

मुंबईसह राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलेल्या कोरोना लसीकरणामुळे मृत्यू आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण घटले आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोना झाल्यानंतर कोणतीही लक्षणे नसल्यांचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त आहे, तसेच रुग्णालयात दाखल होण्याचे आणि अतिगंभीर रुग्णांचे प्रमाणही शून्यावर आले आहे.






  Print






News - Rajy




Related Photos