महत्वाच्या बातम्या

 टायगर ग्रुपचे सामाजिक कार्य प्रशंसनीय : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


- आलापल्ली शहरासाठी वातानुकूलित शवपेटी, गरजू गरीब शालेय विद्यार्थ्यांना १५ सायकलीचे राजेंचा हस्ते लोकार्पण 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आलापल्ली शहरात शवपेटीची कमतरता होती, नातेवाईकांचा मृत्यू झाल्यावर शवपेटीसाठी जनतेला कमालीचा त्रास होत होता, ह्याबाबतची माहिती टायगर ग्रुप आलापल्ली कडून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना देण्यात आली. तेंव्हा लोकांची गरज लक्षात घेऊन राजेंनी तात्काळ स्वखर्चाने वातानुकूलित शवपेटी आलापल्ली आणि परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. ह्याचा मोठा फायदा आलापल्ली आणि परिसरातील जनतेला होणार आहे.

अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गरीब शालेय विद्यार्थी सायकल नसल्याने अनेक किलोमीटर पायदळी शाळेत जातात ह्याबाबतची माहिती टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी राजेंना दिल्यावर त्यांनी तात्काळ स्वखर्चाने १५ सायकली शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी बोलावले. ह्यामुळे ह्या विद्यार्थ्यांची पायदळी जाण्याची अडचण दूर झाली आहे.

वातानुकूलित शवपेटी तथा १५ सायकली ह्यांचे लोकार्पण नुकतेच गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय आलापल्ली येथे करण्यात आले. ह्यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, संतोष मद्दीवार, टायगर ग्रुपचे अध्यक्ष दौलत रामटेके, साई तुलसीगीरी, सहा. पोलीस निरीक्षक मोतीराम मडावी, ग्रा.प सदस्य सोमेश्वर रामटेके, ग्रा.प सदस्य मनोज बोलूवार सह टायगर ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos