१८ वर्षांखालील मुलांना कोरोना लस टोचली जाणार : जगातील पहिला प्रयोग नागपुरात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नागपूर :
भारतासह जगभरात सध्या कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाच्या या लढाईत भरताला महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाल्यानंतर लवकरच आणखीन एक गूड न्यूज मिळणार आहे. भारतात आता 18 वर्षांखालील लहान मुलांनादेखील लवकरच लस टोचली जाणार असून यासंदर्भातील जगातील पहिला प्रयोग हा महाराष्ट्रातील नागपुरात केला जाणार आहे. भारत बायोटेकतर्फे हा प्रयोग केला जाणार आहे.
भारतात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. ऐन कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना शाळा सुरू झाल्याने अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली होती, तर अनेक पालकांनी याविरोधात तीव्र नाराजीदेखील व्यक्त केली होती. पण आता मात्र 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांनादेखील लस देण्यात येणार असल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भारत बायोटेकमार्फत फेब्रुवारीअखेरपर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाची चाचणी केली जाऊ शकते. यासाठी कंपनीकडून देशातील काही लहान मुलांची रुग्णालयेदेखील निवडली असून लवकरच याची अंतिम प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
- वय वर्षे 2 ते 18 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना लस टोचली जाणार आहे.
- केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच ताबडतोब लसीकरण सुरू केले जाणार आहे.
येत्या चार महिन्यांत लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यासंदर्भातील घोषणा केली जाईल.
  Print


News - Nagpur | Posted : 2021-02-08


Related Photos