महत्वाच्या बातम्या

 समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची कुटुंब आणि बालकल्याण अंतर्गत येणाऱ्या नामांकित संस्थानां भेटी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली: श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले - आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोलीच्या वतीने एम एस डब्ल्यू  सेम - ३ च्या विद्यार्थ्यांनी कुटुंब व बालकल्याण या समाजकार्याच्या क्षेत्रा अंतर्गत २ संस्था भेटी करण्यात आल्या.  त्यामध्ये अहिल्यादेवी बालसदन लोकमंगल संस्था, घोट या नामांकित संस्थेला भेट दिली. या भेटीचा उद्देश म्हणजे कुटुंब आणि बालकांसाठी ही संस्था कशा प्रकारे कार्य करते त्याची पूर्ण कार्यप्रणाली जाणून घेणे. सदर संस्था निराधार महिला व बालकांकरिता कार्य करीत असून या संस्थेमार्फत स्वाधार गृह, कायदेविषयक सल्ला केंद्र, बेअर फूट लॉयर केंद्र, सर्वांगीण विकास कार्यक्रम राबविण्यात येतात. या संस्थेच्या कार्याची विस्तृत माहिती समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी जाणुन घेतली. सदर संस्थाभेट समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. वनमाली व प्रा. उईके यांच्या नियोजनातून करण्यात आली. याप्रसंगी संस्थाभेटीचे प्रास्ताविक प्रा.वनमाली यानी केले. उपस्थित संस्थेचे कर्मचारी सिस्टर उषा व उमाजी कुद्रपवर सर यानी संस्थेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर संस्था भेटीचे संचालन शुभम भैसारे व आभार कु.दिक्षा तेलकापल्लीवर हिने मानले. त्यानंतर इंदिरा गांधी मुखबधिर निवासी विद्यालय,चामोर्शी या विद्यालयाला भेटी देण्यात आली. मूकबधीर विद्यार्थ्यांची शिक्षण व विद्यार्थ्यांची विकास प्रणाली कशापद्धतीची आहे, व सदर विद्यालय विद्यार्थ्यांकरिता कशाप्रकारे कार्यरत आहे .याकरिता सदर संथाभेटीचे आयोजन करण्यात आले. या विद्यालयात वर्ग १ ते ७ पर्यंतचे शिक्षण दिले जाते.त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केल्या जाते. यावेळी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी तेथील विद्यार्थ्यांशी त्यांच्या शिक्षकामार्फत सुसंवाद साधताना तेथील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रास्ताविक प्रा.उईक मॅडम यांनी केले तर यामध्ये उपस्थित चौधरी सर, सोनकुसरे सर व भगत सर यांनी संस्थेविषयीचे सविस्तर माहिती आपल्या मार्गदर्शनातून दिली. संस्थाभेटीचे संचालन कु.रुपाली होळी व आभार तिलोत्तमा चुधरी यांनी मानले व दोन्ही संस्थेत त्यांना खाऊचा सुध्दा वाटप करण्यात आला. सदर संस्थाभेट यशस्वीरित्या पार पडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos