महत्वाच्या बातम्या

 एक क्लिकवर वकिलाच्या खात्यातून दीड लाख गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत सायबर क्राईममधील घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाले आहे. वेगवेगळ्या लिंक पाठवून सायबर भामटे एका क्षणात बँक खाते खाली करतात. असाच प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. तुमचे एसबीआय बँकेचे  युनो खाते बंद होत आहे, असा मेसेज आल्याने पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी आलेल्या लिंकवर क्लिक करणाऱ्या वकिलाच्या खात्यावरून दीड लाख रुपये काही क्षणात सायबर भामट्याने उडवले आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगत नारायण राजकरण सिंग (एन २, रामनगर, ह. मु. नोएडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते सर्वोच्च न्यायालय (दिल्ली) येथे वकील आहेत. त्यांचे स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या क्रांती चौक शाखेत खाते आहे. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाइलवर मेसेज आला. एसबीआयचे युनो खाते बंद करण्यात आले असून कृपया पॅन कार्ड अपडेट करा असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला होता. सोबतच लिंक देण्यात आले होते.

जगत नारायण यांनी लिंक ओपन केले. ही लिंक ओपन केल्यानंतर यामध्ये पॅनकार्डचा कोणताही ऑप्शन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित ही लिंक बंद केले. दरम्यान, काही क्षणात त्यांच्या खात्यावरून १ लाख ४९ हजार ९९९ रुपये कपात झाल्याचा मेसेज आला, असे त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे करत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos