महत्वाच्या बातम्या

 सदैव तेली समाजासोबत राहील : आमदार किशोर जोरगेवार


- तेली युवक मंडळाच्या वतीने भव्य उपवर-उपवधू मेळावा व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : तेली हा धार्मीक आणि सामाजिक बांधीलकी जपणारा समाज आहे. समाजातील युवक हे प्रतिभावंत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आजच्या या उपवर-उपवधु मेळाव्याच्या माध्यमातुन समाज एकत्रीत आला आहे. यात समाजाच्या समस्या व प्रश्नांबाबत चिंतन व्हावे. हे प्रश्न आमच्या पर्यत्न पोहचावेत. ते सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कटिबध्द असुन तेली समाजासोबत होते आणि पुढेही राहिल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

माश्रोती सभागृह येथे तेली युवक मंडळाच्या वतीने भव्य उपवर-उपवधू मेळावा व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, वेकोलीचे सिजीएम संजय वैरागडे, सिंदेवाहीचे नगराध्यक्ष सुधिर कांबळे, तेली समाजाचे विदर्भ अध्यक्ष बाबुलाल शेंडे, महिला अध्यक्ष दुधलकर, सेवादल चे सुर्यकांत खनके, माजी नगरसेविका चंदा ईटनकर, छबु वैरागडे, प्राचार्य जर्नाधन दुधलकर, विनोद बुटले, आकाश साखरकर, यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, तेली युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी उपवर-उपवधु मेळाव्याचे आयोजन केल्या जात आहे. प्रत्येक समाजाने असे आयोजन नियमित केले पाहिजे. अशा आयोजनातून समाज एकत्रीत येतो. आजच्या धावपडीच्या युगात समाजातील योग्य वर वधु शोधण्यासाठीही असे आयोजन गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. तेली समाज आपल्या पारंपरीक व्यवसायकडुन दुर जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. नौकरीच्या शोधात राहा पंरतु त्या सोबतच स्वयंरोजगारातुन समाजाची आर्थिक प्रगती साधा असे आवाहणनही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील युवक युवतींना केले.

आपण सेवेकरी समाज आहोत. तेली समाजाने चंद्रपूर जिल्ह्याला अनेक मोठे नेतृत्व दिले आहे. या समाजातील युवक-युवती मागे राहता कामा नये, या समाजाच्या अडचणी सोडविण्याचे लोकप्रतिनीधी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहे. आपण संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यांना सभागृहासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतुन तयार होणार असलेले हे सभागृह समाजाच्या सामाजिक, धार्मीक कार्यक्रमासांठी उपलब्ध असणार आहे. तर बाबुपेठ येथे ही श्री संताजी यांच्या खुल्या मंचासाठी आपण निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा काही शेवट नाही. समाजाने पुन्हा कुठे गरज असल्यास तशी मागणी करावी निधी देऊ असेही यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले.

सामाजिक आणि धार्मीक क्षेत्रात तेली समाज बांधवाचे मोठे योगदान राहिले आहे. सामाजिक कार्यात पूढे असणारा हा समाज आहे. समाजातील युवकांमध्ये समाजकार्याची आवड आहे. वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याचे काम समाजाच्या वतीने केल्या जात आहे. असे असल्याचे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos