महत्वाच्या बातम्या

 दाट धुक्यांमुळे आठ वाजेपर्यंत रस्त्यावरील रहदारीला अडथळा : पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून दाट धुक्यासह, अंधुक वातावरणाने नागरिकामध्ये थंडीची हुडहुडी भरलेली दिसत आहे. या वातावरणाने गहु, हरभरा, कांदा पिकासह भाजी वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दाट धुक्यांमुळे सकाळी आठ वाजेपर्यंत रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. तीन दिवस दाट धुक्यासह थंडीची हुडहुडी व अंधुक वातावरण राहील असा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत आहे.

मागील दिवसापासून सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. सकाळीदहा वाजेपर्यंत वाहन चालकांना वाहनांचे पार्किंग लाईट लाऊन वाहणे सावकाश चालवावे लागत आहेत. तर शेतातील गहु, हरभरा, कांदा बिजवाई तसेच काही प्रमाणात तुर पिकाला या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. हरभरा पिक शेतातील अनेक जागेवर जळालेले दिसत आहे. भाजी वर्गीय पिकातील कोबी, भेंडी, वांगे, मेथी, पालक, टमाटे या सारख्या विविध पिकाला दाट धुक्याचा फटका बसलेला दिसत आहे.

अनेक जागेवर भाजीपाला गुराढोरांना चारा म्हणून टाकल्या जात आहे. तर नुकताच लावलेल्या भाजीपाल्यावर दररोज रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत आहे. अचानक आलेल्या दाट धुक्याने अनेक पिकांना फटका बसल्याचे शेतकरी वर्गाकडुन बोलल्या जात आहे. मागील तीन दिवसापासून दाट धुके, अंधुक वातावरण आणि थंडीच्या हुडहुडी ने जणजिवन विस्कळीत झाले आहे. भाजीपाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसलेला आहे. सध्या हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos