महत्वाच्या बातम्या

 पतीने घटस्फोटासाठी पत्नीला फिनेल पाजून अंगावर फेकले ॲसिड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : संताप आणि चीड आणणारी घटना मुंबईतील मालाड येथुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी घटस्फोट देत नाही म्हणून माथेफिरु नवऱ्याने तिला फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्या अंगावर ॲसिड फेकले.
यामध्ये पत्नी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, पत्नीच्या तक्रारीनंतर पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पतीने पत्नीला जबरदस्तीने फिनेल पाजले. तिने उलट्या करुन हे सर्व फिनेल बाहेर काढले. यावेळी बाथरुममधील ॲसिड पतीने आणून तिच्या अंगावर ओतले. यावेळी तिने चेहरा मागे केला असताना तिच्या छातीवर ॲसिड पडले. यात ती जखमी झाली. घटस्फोटासाठी हे अमानुष कृत्य केल्याचे पुढे आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या पत्नीशी पटत नसल्याने पतीने दुसऱ्या एका महिलेला घरी आणले. मात्र, पहिली पत्नी घटस्फोट देत नसल्याने तिला फिनेल पाजले. तरीही ती ऐकत नसल्याने तिच्या अंगावर ॲसिड फेकले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी तिचा पती आणि त्याची दुसरी पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos