महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (८ जानेवारी )

८ जानेवारी १८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

८ जानेवारी १८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

८ जानेवारी १८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.

८ जानेवारी १८४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.

८ जानेवारी १८४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.

८ जानेवारी १८५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.

८ जानेवारी १९६३: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.

८ जानेवारी २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

८ जानेवारी २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

जन्म (८ जानेवारी )

मृत्यू (८ जानेवारी )

८ जानेवारी १६४२: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)

८ जानेवारी १८२५: कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७६५)

८ जानेवारी १८८४: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)

८ जानेवारी १९४१: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

८ जानेवारी १९६६: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९०९)

८ जानेवारी १९६७: प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)

८ जानेवारी १९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन.

८ जानेवारी १९७३: तत्वज्ञ आणि विचारवंत स. ज. भागवत यांचे निधन.

८ जानेवारी १९७६: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १८९८)

८ जानेवारी १९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.

८ जानेवारी १९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.

८ जानेवारी १९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.

८ जानेवारी १९९५: समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन. (जन्म: १ मे १९२२)

८ जानेवारी १९९६: फ्रान्सचे २१वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos