दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी


- साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी शिर्डी येथे उपस्थिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
  राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत दिली जाईल. त्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून ज्या योजना सुरु केल्या जातील त्या सर्व योजनांना केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  शिर्डीमध्ये आयोजित साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत  होते.
देशातील शेतकऱ्यांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत अडकून पडलेल्या विविध योजना पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे. महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. या योजनेमुळे राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली, आणखी ९ हजार गावे दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर आहेत असे सांगत मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या पीकाला जास्त भाव मिळावा यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरु आहेत. आमच्याच सरकारने एमएसपीची शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. सरकारने ऊसासह खरीप आणि रब्बीच्या २१ पिकांचे समर्थन मूल्यावर ५० टक्के लाभ निश्चित केला आहे. सरकार शेतीबरोबर पर्यटनालाही चालना देत आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-19


Related Photos