महत्वाच्या बातम्या

 वासेरा येथे रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी करण्यात आली.

हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते. महर्षी वाल्मिकी  यांची जयंती दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

या निमित्ताने वासेरा येथे महर्षि वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन केले. दिवसभर वाल्मिकी भजन मंडळी वासेरा/सिंगळझरी यांनी प्रभोदनात्मक भजन सादर केले. सायंकाळी काला वाटुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रस़ंगी समितीचे अध्यक्ष विनोद मेश्राम, संदिप शेंडे, दिलीप मेश्राम ग्रा.प सदस्य, किशोर मेश्राम, राजु मेश्राम, रवी मेश्राम, आनंदराव शेंडे, संभाजी पोवणकार, खटुजी मेश्राम, राजु पांडुरंग मेश्राम, गुरुदास मेश्राम, मधुकर मेश्राम, अभिमन्यू पोवणकार, प्रभाकर पोवणकार, श्रावण मेश्राम, शिशुपाल ठाकरे, नितेश मेश्राम, विकास मेश्राम, विलास मेश्राम, प्रमोद मेश्राम, अजय मेश्राम, देवाजी मेश्राम व समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos