'सावली क्रीडांगणासाठी तीन करोड' विजय वड्डेटीवार यांची घोषणा : पालकमंत्री चषकाचे थाटात उदघाटन


- क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांचा सत्कार करताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली :
युवक एकत्र आले तर कोणतेही दिव्य सहज पार करू शकतात. याचेच उदाहरण म्हणजे सावली येथील युवकांनी स्वतः हातात फावडा घेऊन तयार केलेले हे क्रीडांगण होय. क्रीडांगणावरून मोठे खेळाडू तसेच देशसेवेसाठी लढणारे सैनिक तयार व्हावे, यासाठी येथे तीन करोड रुपयांचे सर्व सोयी सुविधा युक्त क्रीडांगण तयार करण्याची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
सावली तालुका कला क्रीडा युवा महोत्सवच्या अनुषंगाने योगी नारायण धाम परिसर येथे पालकमंत्री चषकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, सहउदघाटक म्हणून देसाईगंज नगर पंचायत जैसाभाई मोटवाणी, प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जि. प. सदस्य ॲड. राम मेश्राम, शांताई फाऊंडेशनचे अमोल नाडेमवार, साईराम शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय मुत्यलवार, पं. स सभापती विजय कोरेवार, युवक शहर काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दुव्वावार, माजी जि. प सदस्य दिनेश चिटनूरवार आदी उपस्थित होते. नामदार वड्डेटीवार पुढे म्हणाले, युवकांचा या स्पर्धा परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी ई लायब्ररी तयार करण्यात येणार आहे. यासोबतच रमाई सभागृहासाठी एक करोड रुपये अतिरिक्त देण्याची घोषणाही यावेळी केली. याप्रसंगी सैन्य भरतीसाठी निवड झालेल्या सावली येथील प्रफुल्ल सुनील बोरकर, बादल काशिनाथ खोब्रागडे, नितेश दिनेश वाढई, तसेच डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा. डॉ. भास्कर सुखारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच झुडपी जंगल स्वच्छ करुन क्रीडांगण तयार केल्याबद्दल युवकांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक युवक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन दुव्वावार संचालन व आभार परिमल डोहणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अंतबोध बोरकर, प्रफुल्ल बोरकर, गब्बर दुधे, प्रशांत नारनवरे, विक्रांत दुधे, अंकित भडके, साहिल वासाडे, पुष्पकांत डोंगरे, बादल खोब्रागडे, रोहीत बोरकर, सचिन रायपुरे, भुवनेश्व गणवीर, वेलकम वाळके आदींनी प्रयत्न केले.
  Print


News - Chandrapur | Posted : 2021-01-30


Related Photos