महत्वाच्या बातम्या

 गाण्यांच्या ठोकावर थिरकली शाळकरी मूले


- लोकमान्य प्राथमिक विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वरोरा शहरातील लोकमान्य प्राथमिक विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे  आयोजन करण्यात आला होते. या कार्यक्रमाचा समारोप ७ जानेवारी रोज शनिवारला झाला. ६ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीसह वेगवेगळ्या गाण्यांवर शाळकरी मुले थिरकली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.

या क्रीडा महोस्तवात संगीत खुर्ची, कबड्डी, रस्सी खेच, उंच उडी या सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच सोबत मुलांची बोद्धिक क्षमता वाढावी या करिता सामान्य ज्ञान स्पर्धा, हस्तकला प्रदर्शनी या सह विविध उपक्रम राबविण्यात आले. ६ तारखेला झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ जोशी, प्रमुख अतिथी म्हणून लोक शिक्षण संस्थेचे संचालक मंगेश मल्हार तर अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज कथडे, प्रमुख पाहुणे म्हणून, माजी मुख्याध्यापक श्रीकांत भोंबे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष त्रिशूल घाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आशिष घुमे, मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता उरकांडे यांनी केले तर आभार रामभाऊ घोरुंडे यांनी मानले .

७ जानेवारीला क्रीडा स्पर्धेच्या व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना लोकमान्य विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राहुल राखे, लोकमान्य इंग्रजी माध्यम विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय आंबुलकर व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोस्तवाच्या यशस्वीतेतकरीता शाळॆतील शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos