महत्वाच्या बातम्या

 मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेतला हिंगणघाट व समुद्रपुर पंचायत समितीचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी हिंगणघाट व समुद्रपुर पंचायत समितीचा आढावा आज हिंगणघाट येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्य स्थिती व प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विविध गावांना भेट देत विकास कामांची पाहणी केली. आढावा बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीर सुरज गोहाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, संशोधन अधिकारी अपुर्व फिरके, हिंगणघाटचे गटविकास अधिकारी प्रशांत भोयर, समुद्रपुरचे रोशन कुमार दुबे उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मिशन ग्रामोदय योजनेतर्गत प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी ५ ग्राम पंचायतीची निवड केली. त्यात हिंगणघाट येथील अल्लीपूर, वणी, जांगोणा, वाघोली, सावली (वाघ) तर समुद्रपूर येथील भोसा, बरबडी, पाठर, उब्दा, कानकाटी या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये शासनाच्या सर्व योजना कार्यान्वीत करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. जीपीडीपी योजनेतर्गत आराखड्यामध्ये ग्रामोदय मिशन योजनेचा समावेश करुन आराखडे तयार करण्यात यावे. सदर आराखडे विहित मुदतीत ऑनलाईन करण्याबाबत निर्देश देण्यात आले. १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीमधून मागील वर्षातील कामे मार्च पर्यत पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. रोजगार हमी योजनेतर्गत अपूर्ण कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण विभागाचा आढावा घेतांना अध्ययन स्तरामध्ये भाषा आणि गणित विषयामध्ये १० टक्के वाढ झाली असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. एकात्मिक बाल विकास योजनेतर्गत सॅम व मॅम योजनेचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती समुद्रपूरने कुढलाही निधी न वापरता विविध उपाययोजना करुन सॅम मधिल बालकांची सुधारणा केल्याने सीईओंनी कौतूक केले. आरोग्य विभागाचा आढावा घेतांना गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढण्याचा आढावा घेण्यात आला. ही कामे मिशन मोडवर करण्याबाबत यावे. कायाकल्प मध्ये ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम ५० टक्केच्या खाली आहेत तसेच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम ५० टक्केच्यावर आहे त्यांनी ८० टक्केवर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. ग्राम पंचायतीच्या वसुलीचा देखील आढावा घेतला. वसुली वाढविण्याच्या सुचना त्यांनी केल्या.  स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची कामे ३१ जानेवारी पर्यत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.  
गावांना भेटी व कामांची पाहणी : बैठकीनंतर घुगे यांनी ग्रामपंचायत वाघोली येथील बचत गटामार्फत सुरु असलेल्या बॅक् ऑफ बडोदा ग्राहक केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. चांगल्या कामासाठी शिला पेले यांचे त्यांनी अभिनंदन केले. सुलोचना फुड प्रोसेसिंग प्रॉडक्ट, स्वरुप स्वयंम सहाय्यता गटामार्फत चालविल्या जात असलेल्या दुधडेअरीची पाहणी केली. अल्लीपुर येथील स्वयंम सहाय्यता गटामार्फत चालविल्या जात असलेल्या खुशी साडी सेंटर, अल्लीपूर येथे ग्रामपंचायतच्या वाचनालयास भेट दिली. येरणगाव, शेकापुर बाई येथे शाळा भेट व शैक्षणिक गुणवत्ता चाचणी घेतली व बांबर्डा येथील पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली.






  Print






News - Wardha




Related Photos