महत्वाच्या बातम्या

 ट्रक, दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वरोरा : वरोरा येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या येन्सा या गावा जवळ शुक्रवारला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू तर, दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गौदास मगरे आणि राजेंद्र मगरे दोघेही राहणार बांद्रा, या आपल्या गावावरून वरोऱ्याकडे रात्री सात वाजताच्या सुमारास दुचाकी ( MH/34/R/1885) येत होते. त्याच वेळेला नागपूर कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक (MH/40/N/3745) याने दुचाकीला मागवून धडक दिली. त्यात गौदास मगरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजेंद्र मगरे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.  





  Print






News - Chandrapur




Related Photos