महत्वाच्या बातम्या

  सिरकोंडा येथे क्रिकेट सामान्याचे आयोजन


- मिताली अक्का आत्राम यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेची उत्साहात उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या सिरकोंडा येथे जय सेवा क्रिकेट क्लबच्या वतीने गावात प्रथमच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सिरकोंडा गावात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मिताली अक्का हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आली. उदघाटनानंतर सामान्याला प्रारंभ झाला असून खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, गावात प्रथमच क्रिकेट स्पर्धा आयोजन केल्यामुळे खेळाडूंचा जल्लोषपूर्ण घोषणानी आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात मैदान दुमदुमून गेले.

अध्यक्षस्थानी ग्रापं सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे हे होते. विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, पोलीस उपनिरीक्षक कुळसंगे साहेब, उपसरपंच मुल्लाजी गावडे, वंजा तलंडी, बंडू मामा गावडे, रमेश मानेम, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, गणेश रच्चावार, राजेश पडालवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून लिंगाजी गावडे, बिरा गावडे, सुरेश मडावी, पोचम वेलादी, पेंदोर सर, कपाजी गावडे हे होते.

मिताली अक्का हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी यावेळी खेळाळूनी संघभावना, शिस्त आणि क्रीडा भाव जपण्याचे आवाहन केली. तसेच राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम व सरपंच लक्ष्मण गावडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

क्रिकेट स्पर्धा व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंकर मडावी, भीमराव गावडे, बिरा गावडे, सुरेश मडावी,शंकर गावडे,रमेश गावडे लिंगा गावडे, सुरेश मडावी, शंकर गावडे, सुरा मडावी, वसंत मडावी, अरुण तलंडी यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेंदोर सर यांनी केले. आभार प्रदर्शन बिरा गावडे यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos