महत्वाच्या बातम्या

 दिलखुलास कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सोमवारी मुलाखत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच न्यूज ऑन एआयआर या अँपवरून सोमवार ९, मंगळवार १० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  प्रसारित होणार आहे. पुणे येथे जी २० परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांची सुरु असलेली तयारी जी २० परिषदेमुळे विकासाला मिळणारी गती, पुण्यातील प्रकल्प, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग विभागातील उपक्रम याविषयी मंत्री पाटील यांनी दिलखुलास कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos