महत्वाच्या बातम्या

 प्रारुप मतदार यादी अवलोकनासाठी प्रसिध्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : १ जानेवारी २०२३ अर्हता दिनांकावर आधारीत छाया चित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अंतर्गत ९ नोव्हेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्राप्त झालेले दावे व हरकती निकालात काढून ६०- तुमसर विधानसभा मतदार संघातील मोहाडी तालुक्यातील सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी, तहसिल कार्यालयाचे ठिकाणी ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम मतदार यादी सर्व जनतेच्या अवलोकनासाठी व उपयोगासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी, असे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मोहाडी यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos