पदवीधर अशंकालीन उमेदवारांना मिळणार दिलासा, १४८ कंत्राटी पदे लवकरच भरणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर:   जिल्हयातील विविध शासकीय आस्थापनावर रिक्त असणारी 148 कंत्राटी पदे पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या संवर्गातून भरावयाची आहेत. शासनाने त्यानुषंगाने वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रके निर्गमित केलेली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी या विषयाचा आढावा घेवून संबंधित आस्थापना प्रमुखंना पदे भरण्याविषयी निर्देश दिले आहे.

अनेक‍ आस्थापनांनी केवळ पदे अधिसूचित करण्याची औपचारीक कार्यवाही पूर्ण करुन आजतागायत पदभरती केलेली नाही. या सर्व विभागांना तातडीने प्रक्रीया पूर्ण करण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व शासकीय आस्थापनांनी ऑनलाईन पध्दतीने पदे अधिसुचित करुन पदवीधर अंशकालीन उमेदवारांची कंत्राटी पदावर नियुक्ती करण्याची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले आहे.

यासंदर्भात पदवीधर बेरोजगार संघटनांचे प्रतिनिधींनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. पदवीधर अंशकालीन उमेदवारांची कंत्राटी पदावर नियुक्ती करावयाची प्रक्रीया शासकीय आस्थापना पूर्ण करीत नसल्याचे  जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आाणून दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दखल घेत ही प्रक्रीया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदभा्रतील अहवाल प्रत्येक विभागाने तातडीने सादर करण्याचेही स्पष्ट केले आहे.              Print


News - Nagpur | Posted : 2021-11-12
Related Photos