महत्वाच्या बातम्या

 यूजीसी नेट परीक्षेसाठी वयोमर्यादा झाली कमी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट परीक्षेतील वयोमर्यादेबाबत एक अतिशय महत्त्वाची सूचना जारी केली आहे. हे नेट  JRF परीक्षेतील वयोमर्यादा कमी करण्याबाबत आहे. NTA च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता यूजीसी नेट वयोमर्यादा किती असेल. २०२३ मध्ये होणाऱ्या यूजीसी नेट डिसेंबर २०२२ च्या परीक्षेच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नवीन नियमा नुसारच अर्ज भरावे लागणार आहेत. नेट JRF वयोमर्यादा काय असेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या सूचनेनुसार डिसेंबर २०२२ च्या नेट परीक्षेची उच्च वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचने नुसार, कनिष्ठ संशोधन फेलोशिप म्हणजेच JRF साठीची उच्च वयोमर्यादा १ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मोजली जाणार होती. मात्र आता ती १ डिसेंबर २०२२ पर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजे तीन महिने कमी. जेआरएफची परीक्षा देणार्‍या उमेदवारांनाच हा निर्णय लागू असेल. कारण नेट परीक्षेत कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही आता १ डिसेंबर २०२२ नंतर ज्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त आहे ते JRF परीक्षेसाठी पात्र असणार नाहीत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पूर्वी प्रमाणेच सवलत दिली जाईल. परंतु त्यांची कमाल वयोमर्यादा देखील १ डिसेंबर २०२२ च्या सुधारित कटऑफ तारखेपर्यंत गणली जाईल. वयोमर्यादेबाबत हा निर्णय का घेण्यात आला? नोटिसमध्ये, NTA ने म्हटले आहे की केवळ काही उमेदवारांनी यूजीसी ला विनंती पाठवली आहे की JRF साठी उच्च वयोमर्यादा मोजण्याची अंतिम तारीख सुधारली जावी. यावर विचार केल्यानंतर, यूजीसीच्या नेट ब्युरोने २ जानेवारी रोजी एनटीएला वयोमर्यादेच्या कटऑफ तारखेत सुधारणा करण्यासंदर्भात पत्र पाठवले. ज्याच्या आधारावर NTA ने हा निर्णय घेतला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos