महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची जमनी, दहेगाव, किरण गारमेंट उद्योगाला भेट व पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासकीय योजनांच्या कामांना भेट दिले.  प्रामुख्याने जमनी येथील रेशीम कार्यालयातील रेशीम उद्योग याविषयी माहिती जाणून घेतले. यामध्ये प्रामुख्याने रेशीम निर्मितीची प्रक्रिया, रेशीम उद्योगामधील विविध टप्पे व जिल्ह्यातील उद्योगाचा आढावा त्यांनी घेतला. रेशीम विकास अधिकारी ढोले यांनी जिल्हाधिकारी महोदयांना सविस्तर माहिती दिले.

रेशीम विकास कार्यालयाच्या सुषमा लोणारे, भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कुंभेजकर एकलारी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या किरण गारमेंट उद्योगाला भेट देऊन पाहणी केले. यावेळी या गारमेंट उद्योगातील महिलांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. तसेच या गारमेंट उद्योगाद्वारे साधारणता ५० महिलांना नियमित रोजगार दिल्याचे माहिती दिले.

माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांनी प्रकल्पाची तांत्रिक बाजू समजावून सांगितले. यावेळेस उत्पादित कपड्यांना जास्तीत जास्त बाजारपेठ मिळण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने गारमेंट व्यवसाय विकसित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. त्यानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरांचा गोठा बांधण्यात आलेल्या दहेगाव येथील शेतकरी लंकेश्वर बराडे यांच्या शेतातील गोठ्याला भेट देऊन पाहणी करून नरेगाच्या कामाविषयीची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडून घेतले. गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर ह्या देखील यावेळी उपस्थित होत्या. मनरेगाचे कामकाज करतांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी कामाचे सनियंत्रण वेळोवेळी करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिले.





  Print






News - Bhandara




Related Photos