महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत आरोग्य सेवांवर महत्वपूर्ण चर्चा : ना. प्रकाश आबिटकर यांचे माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्याकडून स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृहात आरोग्य सेवांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम व्हावी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, अशी मागणी डॉ. नेते यांनी केली.

गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या व सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांना केंद्रित आणि परिणामकारक आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ना. आबिटकर यांनी जिल्ह्यातील आरोग्यविषयक अडचणी व गरजा समजून घेत सकारात्मक भूमिका दर्शवित आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos