महत्वाच्या बातम्या

 नागपूर : एसटी कामगारांमध्ये असंतोष, थकीत पगारवाढीच्या रकमेचा मुद्दा चिघळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतीनिधी / नागपूर : राज्य शासनाने एसटी कामगारांना २०२० ते २०२४ कालावधीतील पगारवाढीची थकीत रक्कम ४८ हप्त्यांत देण्याचे मान्य केले होते, परंतु दोन हप्त्यांनंतर थकीत रक्कम देणे थांबविण्यात आले. यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

एसटी कामगार संघटनेने शासनाकडे वारंवार मागणी केली होती, ज्यामुळे पगारवाढीची थकीत रक्कम ४८ हप्त्यांत दिली जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात काही पगारवाढीचे हप्ते मिळाले, परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मात्र हप्त्याचा थकबाकीचा भाग न मिळाल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सांगितले की, ४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि उर्वरित रक्कमेचे वाटप तातडीने करण्याची सूचना त्यांनी दिली आहे.

एसटी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे, ज्यात या मुद्द्यावर चर्चा होईल आणि आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.





  Print






News - Nagpur




Related Photos