नागपूरात आठवडी बाजारात भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या आठवडा बाजारात नागरिकांची गर्दी होत असतानाच एका भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने  नागपूर हादरले  आहे. एका भाजी विक्रेत्यावर चार जणांनी मिळून सपासप वार केले या हल्ल्यात भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भाजी विक्रेत्याला पाहून आठवडा बाजारात गोंधळ उडाला होता. सदर घटनेची  माहिती तातडीने  पोलिसांना देण्यात आली. अक्षय किशोर निर्मले(२३) असे मृताचे नाव आहे. तर, त्याची हत्या करणारे आरोपी दोन सख्खे तर दोन चुलत भाऊ आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार आठवडे बाजार लागला होता. काल मंगळवारी आठवडा बाजार भरला होता. त्याच वेळी बसलेल्या भाजी विक्रेत्यासोबत भावांनी मिळून वाद घातला. तिथे बाचाबाची झाली एकमेकांची कॉलर धरून हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. ४ भावांनी भाजी विक्रेत्यासमोरची भाजी सगळी उधळून लावली आणि तिथे वाद चिघळला. जागेवरून झालेला हा वाद हत्येपर्यंत पोहोचला. डोक्यात राग घातलेल्या या ४  भावांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने सपासप वार केले. भाजी विक्रेता रक्ताच्या थारोळ्यात पडला. याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.  यातील आरोपी वर्मा बंधूंची आठवडी बाजारात प्रचंड दहशत आहे. ते बाजारात जागा देऊन खंडणी वसुलीही करतात. तर अक्षय निर्मले हा सुद्धा गुन्हेगारी वृत्तीचाच होता. या प्रकरणी चार भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2021-01-13


Related Photos