चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीचा अभ्यास करण्यासाठी १३ सदस्यीय समिती जाहीर


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील दारुबंदीसंदर्भात आलेल्या निवेदनाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. गृह खात्याने समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये 13 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून यात 8 अशासकीय तर 5 सदस्य निमंत्रित असतील. समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व अन्य संघटनांची मते जाणून घेऊन निष्कर्ष काढण्याची सूचना करण्यात आली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2021-01-13


Related Photos