अग्निशामक व विद्यूत तपासणी तातडीने करून घ्या : पालकमंत्री एकनाथ शिंदे


- जिल्हा सामान्य व महिला रूग्णालयाला भेट


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला रूग्णालयाला भेट देवून तेथील अग्निशामक व विद्यूत तपासणीबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला रूग्णालयातील नवजात बालक वार्ड, अतिदक्षता विभाग या ठिकाणी भेट देवून महिला रूग्णांशी संवादही साधला. महिला रूग्णालयातील प्रसुती कक्ष, नवजात बालक अतिदक्षता विभाग या ठिकाणी भेट देवून व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयातील नुकतेच नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोलंके, डॉ.सोयाम तसेच इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संवाद साधत असताना नगरपरिषद गडचिरोली व अन्य ठिकाणी अग्निशामक व्यवस्था कशा आहेत यावर त्यांनी विचारणा केली. जिल्हयात फायर ब्रिगेडच्या गाडया दक्षिण गडचिरोलीसह जिल्हा मुख्यालयी चांगल्या स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी नगर विकास खात्यामूधून निधी तातडीने देवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. भंडारा जिल्हयातील घटना अतिशय दुदैवी असून त्यासारख्या घटना पुन्हा होवू नयेत त्यासाठी आपण आवश्यक तपासण्या करूनतातडीने उपाययोजना राबवू. त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाईल असे ते यावेळी म्हणाले. जिल्हयातील इतर समस्यांबाबत प्रेस क्लब मध्ये चर्चा करण्यात आली त्यावेळी गोंडवाना विद्यापीठातील दिक्षांत समारंभाबाबत माननीय राज्यपाल यांना विनंती करू असे त्यांनी सांगितले. तसेच गडचिरोली शहरातील क्रिडांगण, नवीन बगीचा व अंतर्गत रस्ते यासाठी तातडीने प्रक्रिया राबवून वेळेत पुर्ण होण्यासाठी त्या कामांना निधी उपलब्ध करून देवू असे ते म्हणाले. त्यासाठी नगर विकास तसेच जिल्हा नियोजन मधून निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्हयातील पर्यटनाचा आराखडा करा : जिल्हयातील पर्यटनाबाबत उपस्थितांनी प्रश्न केल्यानंतर पालकमंत्री यांनी त्याबाबत आपण लक्ष घालून पुढे कार्य करू असे सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचेशी चर्चा केली. जिल्हयातील पर्यटनाबाबत ठिकाणांची नावे अंतिम करून त्याबाबत विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-01-13


Related Photos