राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उद्या 13 जानेवारी रोजी भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल याप्रमाणे आहे.
13 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव. सकाळी 9.50 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट व राखीव. 10.20 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातून विश्रामभवनाकडे रवाना होतील.
सकाळी 11 वाजता विश्रामभवन येथून भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे यांच्या घरी माधव नगर, खात रोड येथे भेट देतील. सकाळी 11.30 वाजता पाटपंधारे विश्राम भवन पवनीकडे प्रयाण करतील. दुपारी 12.45 वाजता पवनी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता चंद्रपूर जिल्हयाकडे प्रयाण करतील.
News - Bhandara | Posted : 2021-01-12