कोरोना वॅक्सिन सर्वांसाठी सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


- ऑनलाईन बैठकित वॅक्सिनबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- बर्ड फ्ल्यु संक्रमणाच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घ्यावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल झालेल्या ऑनलाइन बैठकी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधला. लवकरच राज्याला कोरोना विषाणु अनुषंगाने वॅक्सिन मिळणार असून वॅक्सिन मिळाल्यावरही आपण गाफील राहता कामा नये असे ते म्हणाले. वॅक्शिनेशननंतरही आपल्याला मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर यांचे पालन करावेच लागेल. लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. त्याकरीता लोकांचे शंकाचे निरसन करण्यात यावे. वॅक्सिन सर्वासाठी सुरक्षित असून सर्वांनी घ्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांना दिल्या. दिलेल्या सूचनांचे पालन करुन त्याची अंमलबजावणी करणे. वॅक्सिनेशनची पहिली लस ही कोविड वारिअर यांना देण्यात येणार असून त्यामुळे जनतेमध्ये विश्वास आपोआप निर्माण होईल असे ते पुढे म्हणाले.
बर्ड फ्ल्यु बाबत बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बर्ड फ्ल्यु पक्ष्यांपासून माणसांत पसरण्याचे प्रमाण  दुर्मिळ आहे. पण गाफिल राहू नये. पक्षी मृत दिसल्यास आरोग्य विभागाला तात्काल सूचना देऊन त्यापासून दूर राहणे. बर्ड फ्ल्यु हे पक्ष्यांचा मल, नाकातील राळ तसेच संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येणे यापासून लागवट होत असते. 
भंडारा जिल्ह्यातील झालेली घटनेची पुनरावृत्ती यापुढे होता कामा नये. याकरीता  सर्व रुग्णालयांना जिल्हाधिकारी, आयुक्त यांनी त्यांच्या हद्दीतील रुग्णालयांना फायर ॲन्ड सेफ्टीचा ऑडीट तात्काल करण्यास सांगावे. रुग्णालयांनी आपल्या इलेक्ट्रिक मेटेंनन्स कडे पुर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक इनेस्पेक्टर यांच्याकडून ऑडीट झाले पाहिजे तसेच तज्ज्ञ इलेक्टिशियनकडूनही वेळेवेळेवर वायरींग चेक करुन घ्यावे. इलेक्ट्रिकलचे असलेले वस्तू दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याकरीता जे जे इलेक्ट्रिकचे वस्तू आहे त्यांची तपासणी करुन घेणे. तसेच अग्निशमन यंत्रणा यांची ट्रेनिंगही  झाली पाहिजे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी उपस्थित होते.

 




  Print






News - Gadchiroli | Posted : 2021-01-12






Related Photos