महानगरपालिका निवडणुकीच्या सुरळीत प्रक्रीयेसाठी मद्यविक्रीवर बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५-२०२६ जाहिर केलेला आहे. त्यानुसार १५ जानेवारी रोजी मतदान तसेच १६ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रीया पार पडत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदान दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीवर बंदी असल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केले आहे.
त्याअनुषंगाने नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रात मतदानाच्या अगोदरच्या दिवशी बुधवार १४ जानेवारी रोजी व मतदानाच्या दिवशी गुरुवार १५ जानेवारी आणि मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी मद्य विक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिका निर्वाचन क्षेत्रातील सर्व अनुज्ञप्ती मतदानापूर्वीचा दिवस १४ जानेवारी, नागपूर महानगरपालिका निर्वाचन क्षेत्रातील सर्व अनुज्ञप्ती १५ जानेवारी नागपूर महानगरपालिका निर्वाचन क्षेत्रातील सर्व अनुज्ञप्ती तसेच १६ जानेवारी मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद राहणार आहे.
असे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे कळविले आहे. जे अनुज्ञप्तीधारक आदेशाचा भंग करतील त्यांच्याविरुद्ध नियमानुसार सक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
News - Nagpur




Petrol Price




