समृध्दी महामार्गावर १० टप्प्यात गॅन्ट्री उभारणी ९ ते १३ जानेवारीला : कामाच्या टप्प्यानजीक वाहतूक


- ४५ ते ६० मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत कि.मी. ९०+५०० ते कि.मी. १५०+३०० (ता. धामणगाव रे., ता. चांदूर रे. व ता. नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ९ ते १३ जानेवारी या कालावधीत १० टप्यात करण्यात येणार आहे.
या प्रत्येक टप्यादरम्यान कामाच्या टप्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, म.रा.र.वि.मंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी कळविले आहे.
News - Nagpur




Petrol Price




