११ जानेवारीपासून दहावी-बारावीच्या परीक्षेचा १७ नंबरचा फॉर्म भरण्यास सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेचा 17 नंबरचा नावनोंदणी अर्ज भरण्यास 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह 25 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
दहावीचे विद्यार्थी https://form17.mh-ssc.ac.in या तर बारावीचे विद्यार्थी https://form17.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, नोंदणी शुल्क व इतर कागदपत्रे संपर्प पेंद्रात जमा करण्यासाठी 12 ते 27 जानेवारीपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज ऑनलाइनच भरावेत. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2021-01-01


Related Photos